संदेश मजकूर
<p>लातूर जिल्हयातील सर्व नागरीकांना मन:पुर्वक नमस्कार !<br>पोलीस विभाग हा केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून, तो समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षीत समाज हीच आमची प्रमुख जबाबदारी आहे.<br>समाजकंटक, घटनाबाह्य असामाजीक तत्वे, दहशतवाद इ. बाबत कठोर कारवाई करुन कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयांचा प्रतिबंध व तपास करणे, धार्मिक व जातीय सलोखा राखणे व कायदेविषयक जनजागृती करणे इत्यादी कर्तव्याप्रती आम्ही लातूर पोलीस दक्ष राहून शांत, सुरक्षित व समाजभिमुख सुशासन देणे यासाठी सदैव कटिबध्द आहोत.<br>माझी सर्व नागरीकांना नम्र विनंती आहे की, आपण कायदयाचे पालन करा पोलीसांना सहकार्य करा आणि कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्वरीत पोलीसांशी निसंकोचपणे संपर्क साधा. पोलीस आपले मित्र आहेत.</p>