
लातूर शहर हे शैक्षणिक पॅटर्न म्हणून राज्यभर ओळखले जाते. लातूर शहरात विविध शैक्षणिक क्लासेस व शाळा महाविद्यालयासाठी वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १ लाखाचे वर आहे. कांही कॉफी शॉप धारक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नियम बाह्य डार्क रूम व पडदे लावून आडोशाची व्यवस्था करीत होते. ही बाब ओळखून पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी मा. जिल्हाधिकारी लातूर यांचे माध्यमातून कॉफी शॉप धारकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.