इन्स्पेक्टर दामिनी
२६ फेब्रु, २०२५
पोलीस अधीक्षक, लातूर श्री सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून "इन्स्पेक्टर दामिनी" ही चित्रकथा पुस्तिका बनविण्यात आली आहे. या पुस्तिकेत पोक्सो कायदा, बालमजुरी, बालविवाह, रस्ते अपघात, रॅगिंग कायदा, ज्येष्ठ नागरिक कायदा, सायबर क्राईम, विविध हेल्पलाईन्स, महिला छेडछाड, वाहतूक नियमन या संबंधी एकूण 14 प्रकारच्या चित्रकथा यात घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर पुस्तिका लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे.