
सार्वजनिक प्रवासाची वाहने जसे ऑटो रिक्षा, सिटी बस यामधून प्रवास करणारे महिला व नागरिकांसाठी अडचणीच्या वेळी तात्काळ मदत पोहोचावी यासाठी लातूर शहर व जिल्ह्यातील 3000 ऑटो रिक्षा व सिटी बस मध्ये QR कोड असणारे स्टिकर्स बसविण्यात आले आहेत. अडचणीच्या वेळी QR कोड स्कॅन केल्यास गरजूंना तात्काळ पोलीस मदत पोहोचविण्यास मदत होणार आहे.